पोलिस भरतीला पावसाचा फटका, आजच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलल्या

उर्वरित दिवसांचे शेड्युल ठरल्याप्रमाणे

गडचिरोली : शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्हा पोलिस दलाच्या भरतीसाठी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित शनिवार दि.22 ला होणाऱ्या मैदानी चाचण्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दि.22 ला नियोजित असलेल्या मैदानी चाचण्या 13 जुलै रोजी घेण्याचा निर्णय रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी याची नोंद घेण्याची सूचना पोलिस अधीक्षकांनी केली आहे.

पावसामुळे मैदानाचा पाणी साचून ते धावण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे शनिवारी त्या मैदानाचा वापर करणे शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र दि.24 जून रोजी होणाऱ्या मैदानी चाचण्या व त्यापुढील चाचण्यांमध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे पोलिस प्रशासनाने कळविले.