गडचिरोली : आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता एमपीएससी, जिल्हा निवड समितीमधील विविध पदभरती तसेच आयबीपीएस, एसएससीच्या परीक्षांबाबत स्पर्धापुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज दि.29 जुलैपर्यत सादर करावेत. त्यानंतर दि.30 जुलै रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2, गडचिरोली येथे उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.
सदर प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड (EMPLOYMENT CARD) असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणादरम्यान दरमहा एक हजार रुपये विद्यावेतनही दिले जाणार. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. अधिक माहीतीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी केले आहे.