गडचिरोली : गरजवंतांना शारीरिक अवयव उपलब्ध व्हावेत आणि त्यासाठी अंगदानाची प्रेरणा मिळावी म्हणून 3 आॅगस्ट हा भारतीय अंगदान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन 192 च्या वतीने शुक्रवारी (दि.2) गडचिरोली शहरात बाईक रॅली काढण्यात आली.

बटालियन कमांडंट परविंदर सिंह यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीत अनेक जवान सहभागी झाले होते. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी अंगदानासाठी पुढाकार घ्यावा आणि अंगदान दिवस यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले.


































