भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत तीनही विधानसभा जिंकण्याचा निर्धार

शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे काम करा- नेते

Oplus_0

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा सोमवारी (दि.5) भाजपच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक गडचिरोलीत झाली. विदर्भ संघटनमंत्री डॅा.उपेंद्र कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लोकसभेतील पराभवाची कारणे स्पष्ट करत आगामी विधानसभेसाठी गांभिर्याने कामाला लागण्याच्या सूचना कार्याकर्त्यांना करण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील तीनही विधानसभेत महायुतीच्या विजयाचा निर्धार करण्यात आला.

या बैठकीला माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा), आ.प्रवीण दटके (नागपूर), ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, सहकार नेते प्रकाश सा.पोरेड्डीवार, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, ‌लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलु हुसैनी, अनु.जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे, बंगाली आघाडीचे दीपक हलदार, तसेच मोठ्या संख्येने जिल्हाभरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी डॅा.उपेंद्र कोठेकर, आ.प्रवीण दटके, अरविंद सा.पोरेड्डीवार, आ.डॅा.होळी, आ.गजबे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार अशोक नेते म्हणाले, आपल्या पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. या कार्यकर्त्याच्याच भरोशावर विजयाचा संकल्प असतो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन गड किल्ले जिंकले, त्याप्रमाणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मावळ्यांच्या भूमिकेतून काम करून पक्ष संघटनेची जबाबदारी स्वीकारावी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा संकल्प करुन काम करावे. लोकसभेत आपला पराभव झाला, आता कारणे शोधत न बसता पक्षसंघटनेच्या कामाला लागावे, असा सल्ला देत पुन्हा नव्याने जोमाने पक्षासाठी काम सुरू करण्याचा सल्ला अशोक नेते यांनी या बैठकीत बोलताना दिला.

विरोधकच आता फॅार्म भरायला लागले

महिलांचे सशक्तिकरण व्हावे आणि कौटुंबिक जबाबदारी साभाळताना महिलांचा हातभार लागावा, यासाठी राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला दिड हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेताल. त्याबद्दल दिशाभूल करत विरोधकांनी सुरूवातीला विरोध केला. पण आता ते विरोधकच या योजनेचे फॅार्म करून देताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी महिलांच्या खात्यात दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट-खटाखट देऊ, असं खोटं आश्वासन दिलं. आता ते कुठे गेलं? असा सवाल यावेळी माजी खा.अशोक नेते यांनी उपस्थित केला.

अरविंद सावकारांच्या अभिनंदनाचा ठराव

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सहकार तथा भाजपचे नेते, आणि सर्वोदय संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला. तसेच भाजपला वाढविण्यासाठी योगदान देणारी काही पदाधिकारी गेल्या वर्षभरात स्वर्गवासी झाले. त्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शोक प्रस्ताव सादर करण्यात आला. यावेळी सर्वांना दोन मिनीट मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली.