गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोलीत ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालय, वीर बाबुराव शेडमाके स्मारक, गोकुळनगर अशा विविध ठिकाणी त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारीवृंदांना अशोक नेते यांनी तंबाखूमुक्त व धूम्रपानमुक्तीची शपथ दिली.
घरोघरी तिरंगा, हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत नेते यांच्या शाहुनगर येथील निवासस्थानीही ध्वजारोहन करण्यात आले. विविध ठिकाणच्या ध्वजारोहणाला आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद नरोटे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, ता.महामंत्री बंडू झाडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, नंदु काबरा, माजी खासदारांचे सोशल मिडीया प्रमुख दिवाकर गेडाम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.