चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे स्व.आर.आर. पाटील यांना आदरांजली

कर्तृत्वाची छाप आजही कायम- गण्यारपवार

चामोर्शी : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व.आर.आर. पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज दि.16 ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आदरांजली वाहण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांचा आधारवड असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या याकरीता आर.आर.पाटील यांनी बाजार समितीत अनेक कार्यक्रमात सहभाग दर्शवून आपले भरीव योगदान दिले. त्यांच्या कर्तृत्वाची छाप आजही या जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला आदी घटकांवर आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत चामोर्शी बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यापवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती परमानंद मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, बाजार समितीचे संचालक अमोल गण्यारपवार, बाजार समितीचे प्रभारी पिंपळकर, उपसचिव राजकोंडावार, माजी जि.प. सदस्य राजू आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) चामोर्शी शहराध्यक्ष सुरेश नैताम, ओबीसी शहराध्यक्ष मेघराज वैद्य, महिला शहर अध्यक्ष अनिता नैताम, बाजार समितीचे संचालक नागोबा पिपरे, प्रकाश शिवणीवार, तसेच लक्ष्मण नैताम, पंचरंग मंडल, सुधाकर ढोडरे, सोनल अन्नपत्रावर, गंगाधर कोवे, गोकुळ वासेकर आदी कार्यकर्ते तथा शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.