गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांपैकी कोणते क्षेत्र मिळणार हे निश्चित झालेले नाही. मात्र तीनही क्षेत्रातून ईच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विधानसभा लढवू इच्छिणाऱ्यांनी पक्षाकडे विहित नमुन्यात आणि पक्षाच्या नावाने शुल्क भरावे. हे अर्ज 5 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रदेश कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. इच्छुकांनी 9423423434 या भ्रमणध्वनी क्रमंकावर संपर्क करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी केले आहे.