गडचिरोली : भाजप आदिवासी मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा, मंडळ पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा विदर्भस्तरीय मेळावा येत्या 27 सप्टेंबरला नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीतील विश्राम भवनात नियोजन बैठक घेण्यात आली. माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी मेळाव्याच्या नियोजनाची विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यात विदर्भातील जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन अशोक नेते यांनी यावेळी केले.
या बैठकीला प्रामुख्याने आमदार डॅा.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, डॅा.चंदा कोडवते, डॉ.नितीन कोडवते, भाजपच्या धानोरा तालुकाध्यक्ष लता पुनघाटे, गडचिरोली तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, माजी सभापती रंजिता कोडापे, ता.महामंत्री विजय कुमरे, आदिवासी नेते रेवनाथ कुसराम, विजय शेडमाके, ओमकार मडावी, पल्लवी बारापाहिंगे, विलास उईके, नामदेव आतला, विजय गेडाम, विजय कुळमेथे तसेच मोठ्या संख्येने आदिवासी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.