गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेजमध्ये आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र 

पंतप्रधानांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ 

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने मान्यताप्राप्त गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज, गडचिरोली येथे आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॅान्फरन्सिंग) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे हे केंद्र सुरू करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलिंद नरोटे, धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अनंत कुंभारे, डॉ.प्रशांत चलाख, डॉ.पंकज सकिंलावर, डॉ.उमेश समर्थ, भंडारा पॅरामेडिकल अकॅडमीचे संचालक डॉ.अनिल कुर्वे, तसेच प्राचार्य डॉ.दीप्ती वैद्य, प्रा.नलिना मेश्राम, प्रा.धनश्री देवळीकर, प्रा.भुषण राऊत, प्रा.सायली भांडेकर, प्रा.रचना संतोषवार, प्रा.पल्लवी बोरकर, संजीवनी मेश्राम आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक-युवतींना व्हावा याकरिता देशातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याचा मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा मानस आहे. त्याअंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले.