गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा बीटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मैदानावर उत्साहात पार पडले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या क्रीडा स्पर्धेत अनेक आदिवासी खेळाडूंनी आपले क्रीडा नैपुण्य दाखविले. या स्पर्धेत क्रीडा कौशल्याची छाप पाडणाऱ्या 228 खेळाडूंची निवड ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या गडचिरोली प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनासाठी करण्यात आली.
पोटेगाव शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर यांच्या हस्ते क्रीडाज्योत मालवून या क्रीडा संमेलनाची सांगता करण्यात आली. प्रा.अजय जाधव यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा निरीक्षक सुभाष लांडे, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, प्रा.अजय जाधव, सुधीर झंजाळ, रविकांत पिपरे, मिलिंद निमगडे, वाय.यु.पेंदाम, निलेश कळंब, एस.के.नरोटे, हेमंत पेशट्टीवार, पवनकुमार सोयाम, जे .बी. सेलोकर, पी.टी.गेडाम, जी.जी. पातेवार, एम.पी.पुडके, एच.व्ही.जुवारे, पवन मेश्राम, भाविका सोनटक्के, एस.एम. पुराम, शोभा रामटेके, एस.बी.दर्रो, वर्षा मस्के, एस.आर. कोटांगले, एम.एच. बेसरा, संगीता पुराम आदी मान्यवर उपस्थित होते.
कारवाफा बिटस्तरीय क्रीडा संमेलनात कारवाफा, पोटेगाव, गडचिरोली, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा एकूण आठ आश्रमशाळेतील 267 मुले आणि 257 मुली अशा एकूण 524 खेळाडूंनी सहभाग घेतला. 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील सांघिक व वैयक्तिक खेळांचे आयोजन यात करण्यात आले होते. या स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडा कौशल्य प्रदर्शित झाले.
कार्यक्रमाचे संचालन महिला प्रकल्प क्रीडा समन्वयक प्रमिला दहागावकर यांनी, तर मीनल शेट्टीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, नितेश नेवारे, वीरेंद्र कापसे, जयश्री रामगीरवार, अश्विनी चलाख, पल्लवी मेश्राम, शुभांगी मडावी, लुंबिनी शंभरकर, अनिल कुरुडकर, कारवाफा बीटमधील क्रीडा शिक्षक, पंच, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.