मुतनूरच्या पहाडावर उभारले जातेय आदिशक्ती दुर्गामातेचे भव्य मंदिर

मा.खा.अशोक नेते यांच्याकडून पाहणी

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मौजा मुतनूर या निसर्गरम्य पहाडावर कंत्राटदार तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि अ.भा.मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या वतीने 50 लाखांच्या खर्चातून आदिशक्ती दुर्गामातेच्या मंदिराची उभारणी केली जात आहे. त्या ठिकाणी दुर्गोत्सवानिमित्त महाप्रसाद आणि बालिका पुजनाचा कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. माजी खासदार अशोक नेते यांनी भेट देऊन प्रस्तावित मंदिराच्या बांधकामाची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

या मंदिराच्या बांधकामासाठी जयपूर येथून दगड मागवण्यात आले आहे. राजस्थान येथील कोरीव मंदिर बांधकाम करणाऱ्या कारागिरांची चमू लवकरच मुतनूर येथे येणार असल्याची माहिती यावेळी डॉ. प्रणय खुणे यांनी दिली.

यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, डॉ. मिलिंद नरोटे, डॉ.चंदा कोडवते, खुणे कन्स्ट्रक्शन कंपनीचे राकेश डोंगरवार, लोकेश डोंगरवार, गोंदिया जिल्हा मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गुड्डू खुणे, मानवधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, अजय सोनुले, दिवाकर गेडाम, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध ग्रामसभांचे अध्यक्ष व इलाका प्रमुख उपस्थित होते.

मुतनूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध- नेते

यावेळी माजी खासदार अशोक नेते यांनी मुतनूर या ठिकाणाला निसर्गाची चांगली देण मिळाली आहे. डोंगराळ भाग आणि या रम्य ठिकाणाला आणखी सुविधा देऊन विकसित करणे गरजेचे आहे. एक पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, असे सांगितले.