गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.18 व 19 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील पक्षाचे विधानसभानिहाय नेते, पदाधिकारी, बुथ प्रमुख आणि बीएलए यांच्या महत्वपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ.कुणाल चौधरी, लोकसभा निरीक्षक बेलय्या नाईक, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्यासह दिल्ली येथील प्रमुख प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत.
दिनांक 18 रोजी गडचिरोली विधानसभेसाठी महाराजा सेलिब्रेशन हॅालमध्ये सकाळी 11 वाजता शिबिर होणार आहे. त्याच दिवशी आरमोरी विधानसभेसाठी स्वागत सेलिब्रेशन हॉल आरमोरी येथे दुपारी 2 वाजता शिबिर होईल. दि.19 ला सकाळी 11 वाजता अहेरी विधानसभेसाठी वनस्वी सेलिब्रेशन हॅाल अहेरी येथे हे शिबीर होणार आहे.
पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष, विधानसभा क्षेत्रातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, बीएलए आणि बुथप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
































