जैन कलार समाज स्नेहमिलन सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार आणि कोजागिरी

समाजाच्या एकजुटीसाठी विचारमंथन

सेवानिवृत्त विस्तार अधिकारी रतन शेंडे यांचा सपत्निक सत्कार करताना.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यास व गडचिरोली शहर जैन कलार समाजाच्या वतीने समाजाचा स्नेहमिलन सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच कोजागिरीचा कार्यक्रम शनिवार, 19 ऑक्टोबर रोजी चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्सच्या कमल-केशव सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी समाजाच्या एकजूट व प्रगतीसाठी विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यासचे अध्यक्ष रतन शेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती कार्यकारिणीचे संचालक भूषण समर्थ, जैन कलार समाज बचत गटाचे अध्यक्ष प्रदीप रणदिवे, सचिव मनोज कवठे, न्यासचे सचिव पांडुरंग पेशने, संचालक रवींद्र गोटेफोडे, अर्चना मानापुरे, गुलाब मानापुरे, हेमंत डोर्लीकर, अश्विन भांडारकर, डॉ.उमेश समर्थ, पराग दडवे, महेश मुरकुटे, सुरेखा रणदिवे, भाग्यश्री शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम रामकृष्ण रणदिवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजातील बारावी, दहावी उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी गौरी भांडारकर, ईशान पालांदूरकर, केशरी येनुरकर, सुधांशु शेंडे, विराज वैरागडे, शंतनू मानापुरे, श्रेयश हरडे, भाविका रणदिवे, सारंग समर्थ, श्रेया दहीकर, मंथन किरणापुरे, वैभवी समर्थ, राम बडवाईक, हिरांशी रणदिवे, समिक्षा पाऊलबुद्धे, तन्वी लाड, श्रेयस हरडे, नंदिनी दडवे, रोहन रणदिवे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाल्याबद्दल समीर बनपूरकर यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, मुख्याध्यापक प्रदीप रणदिवे यांचा सपत्निक, तसेच ज्येष्ठ नागरिक माधुरी घुगरे, तुळशीराम दहीकर, नलिनी दहीकर, रमेश मोटघरे, नंदकिशोर रणदिवे, प्रेमिला रणदिवे, आबाजी समर्थ, सिंधुबाई डांगे आदींचा शाल, श्रीफळ व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोरंजनात्मक, उत्साहवर्धक व स्नेहपूर्ण वातावरणात उपस्थित समाजबांधवांनी स्नेहभोजन व रात्री कोजागिरीचा आनंद घेतला. एकमेकांशी संवाद साधून विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले. आजच्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजूटपणे राहणे गरजेचे आहे. संघटित समाजाची राजकीय व सामाजिक क्षेत्रात दखल घेतल्या जाते. त्यामुळे कलार समाज एकसंघ ठेवण्याचे आवाहन रतन शेंडे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

प्रास्ताविक पांडुरंग पेशने यांनी, संचालन प्रदीप लाड तर उपस्थितांचे आभार वैशाली लाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नितीन डवले, ताराचंद समर्थ, वासुदेव लाड, विराग रणदिवे, भूषण दहिकर, भाग्यश्री शेंडे, वैशाली लाड , कल्पना लाड, कविता डवले , ज्योती समर्थ, भावना रणदिवे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमात सुधीर शेंडे, किशोर भांडारकर, कविश्वर बनपूरकर, सुरेश वैरागडे, प्रमोद शेंडे, विजया समर्थ, श्रीधर कवठे, तुकाराम तिडके, प्रकाश डांगे, लता मुरकुटे, स्वाती कवठे, स्नेहा शेंडे, सरिता पेशने, अर्चना भंडारकर, अर्पणा हजारे, रीना दडवे, विजय मुरकुटे, दिलीप समर्थ, राजेंद्र खानोरकर, रवी समर्थ, दिलीप आष्टेकर, अशोक मानापुरे, नितीन डांगे आदींसह जैन कलार समाजबांधवांनी बहुसंख्येने सहभाग घेतला.