मलेरिया जनजागृती कार्यक्रमांतर्गत 30 गावातील स्वयंसेवकांचे प्रशिक्षण

गावात येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन

धानोरा : मलेरिया रोग निर्मूलन जनजागृती कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवकांचे एक दिवसीय प्रशिक्षण धानोरा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले. या प्रशिक्षणात 30 गावातील 30 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणात मलेरिया व त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, गावात काम करताना येणाऱ्या अडचणी यावर मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली.

जिल्हा आरोग्य समिती तथा फॅमिली हेल्थ इंडिया गडचिरोलीअंतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी जिल्हा मलेरिया कार्यालयातील राजेश कोरळकर, संघदीप वनकर, धानोरा येथील मलेरिया पर्यवेक्षक अनिल शंखरे, फॅमिली हेल्थ इंडियाच्या अदिती कोटगले, प्रादेशिक समन्वयक अवधेश सिंग, फिल्ड कोअॅार्डिनेटर मुकेश नागापुरे आणि इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.