गडचिरोली : जेमतेम दोन एकर शेती, त्या शेतीवर काढलेले कर्ज, त्यात वडील आजारी, शेतीतून अपेक्षित उत्पन्न नाही, अशात कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा या विवंचनेतून एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मुन्ना बाजीराव मडावी (37 वर्ष) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
चामोर्शी तालुक्यातील घोटजवळच्या निकतवाडा या गावातील रहिवासी असलेल्या मुन्ना मडावी यांची पत्नी आणि मुले माहेरी गेलेली होती. अशात सोमवारी सकाळी घरी कोणी नसताना त्यांनी घरातील पंख्याला गळफास लावून घेतला.
घोट पोलीस मदत केंद्राचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.