दिल्लीत भाजपची संघटनात्मक बैठक, महामंत्री अशोक नेते यांची उपस्थिती

नवीन कार्यपद्धतीवर विस्तृत चर्चा

गडचिरोली : राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सोमवारी पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी राष्ट्रीय स्तरावरील संघटन बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खा.अशोक नेते यांच्यासह इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत भाजपच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी नव्या कार्यपद्धतींवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला प्रामुख्याने राष्ट्रीय संघटक व्ही.सतीश, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर उराव, राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, गजेंद्र पटेल, गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तावडकर, गुजरातमधील खा.धवल पटेल, गजानन डांगे व जनजाती मोर्चाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.