जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे याही वर्षी क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी समितीच्या वतीने बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्त 23 व 24 डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.23 डिसेंबरला सकाळी 10 वाजता आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर, सायंकाळी 5 वाजता आदिवासी देवी-देवतांची पुजा व रांगोळी स्पर्धा, रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, दिनांक 24 ला दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गावातून रॅली काढली जाणार आहे. यात आदिवासींचे पारंपरिक नृत्य हे विशेष आकर्षण राहणार आहे. 4 वाजता आदिवासींचे प्रतिक असलेले सल्लागाराचे अनावरण व गोंडी धर्म संमेलन, सायंकाळी 6 वाजता स्वधर्म विवाह सोहळा, रात्री 9 वाजता गोंडी समुह नृत्य स्पर्धा होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आणि खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष अतिथी म्हणून आ.रामदास मसराम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर राहणार आहेत, असे क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीने कळविले.