अहेरी : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील नागरिकांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. आजाराने ग्रासलेल्या आणि अडचणीत असलेल्या नागरिकांच्या आर्थिक मदतीसाठी सुपरिचित असणाऱ्या अम्ब्रिशराव यांनी अहेरी तालुक्यातील बोरी क्षेत्रातील ओडीगुडम येथील रहिवासी मल्ला विस्तारी टेकुलवार यांना मदतीचा हात पुढे केला.

मल्ला टेकुलवार हे अनेक दिवसांपासून अर्धांगवायू (लकवा) या आजाराने ग्रस्त आहेत. उपचार करण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्यांचे कुटूंबिय चिंतेत होते. टेकुलवार कुटुंबाची ही समस्या कार्यकर्त्यांनी अम्ब्रिशराव आत्राम यांच्यापर्यंत पोहोचविल्यानंतर त्यांनी टेकुलवार कुटूंबाला 10 हजार रुपयांची मदत पाठविली. तसेच गरीब कुटुंबाला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची किट वाटण्यात आली.
यावेळी बोरी येथील भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते विक्की पुल्लीवार, लक्ष्मण पानेमवार, भाजपचे कार्यकर्ते व टेकुलवार कुटुंबातील सदस्य, ओडीगुडम येथील गावकरी उपस्थित होते.
































