कुटुंबियांपासून दुरावलेल्या मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी ‘त्या’ झाल्या बहिणी

आधारविश्व फाऊंडेशनचा आदर्श उपक्रम

गडचिरोली : भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचे बंधन घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. कोणाला बहिण नसते, तर कोणत्या बहिणीला भाऊ नसतो. पण भाऊ-बहिण दोघेही हयात असतानाही काही जणांना कौटुंबिक कलहामुळे या पवित्र नात्यातील प्रेमापासून वंचित राहावे लागते. विविध कारणांमुळे कुटुंबियांपासून दुरावलेल्या आणि त्यामुळे वृद्धाश्रमात राहणाऱ्या गडचिरोलीतील वृद्धांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने आधारविश्व फाऊंडेशन या संस्थेच्या महिला सदस्यांनी प्रेमाचा ओलावा दिला.