गडचिरोली : ग्रामीण भागात दारू व तंबाखूचे वाढते व्यसन गावाच्या विकासात अडसर निर्माण करीत असल्याने निर्माण, मुक्तिपथ आणि मानसिक आरोग्य विभाग (सर्च) यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा तालुक्यातील चातगाव ते साखेरा शोधयात्रा काढण्यात आली.
ग्रामीण भागात वाढत चाललेले दारू आणि तंबाखूचे सेवन, व्यसनामुळे होणारे आजार व एका माणसाच्या व्यसनामुळे पूर्ण कुटुंबाला होणारा त्रास, महिलांवर होणारे अत्याचार हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी शोधयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कटेझरी, खुटगाव येथील गाव संघटनेच्या महिलांनी यात्रेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या दोन्ही गावातील महिलांनी पुढाकार घेत आपल्या गावाला अवैधपणे चालणाऱ्या दारू विक्रीतून मुक्त केले आहे. आमच्या गावाची प्रेरणा इतर गावांनी घ्यावी, असे आवाहन सुद्धा संबंधित गावातील महिलांनी केले.
या पदयात्रेत गडचिरोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ६५ युवा व युवतींनी सहभाग नोंदविला.