संविधान बचाव संघर्ष समितीमार्फत 30 डिसेंबरला निषेध मोर्चा व सभा

सर्वपक्षीय बैठकीत घेतला निर्णय

गडचिरोली : महाविकास (इंडिया) आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा ), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, कॅाम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यासह इतर पक्ष आणि सामाजिक संघटनांची सर्वपक्षीय बैठक बुधवारी गडचिरोलीत पार पडली. यावेळी केंद्र आणि राज्यातील विविध मुद्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून येत्या 30 डिसेंबरला निषेध मोर्चा आणि जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यातील महाविकास (इंडिया) आघाडीतील घटक पक्ष आणि सामाजिक संघटना या बैठकीला उपस्थित होत्या. गडचिरोली शहरातील शिवाजी महाविद्यालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत निषेध मोर्चा आणि त्यानंतर राजीव गांधी सभागृह येथे निषेध सभा घेण्यात येणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, कॅाम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते देवराव चवळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत कुळसंगे, सतीश विधाते, विजय गोरडवार, अॅड.कविता मोहरकर, कुसुम आलाम, सुरेश भांडेकर, प्रदीप भैसारे, माधव गावड, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, नितेश राठोड, अमोल कुळमेथे, नहिम शेख, जावेद खान, काशिनाथ भडके, पौर्णिमा भडके, कविता उराडे, रिता गोवर्धन, सुशील हुलके, प्रल्हाद रायपुरे, ज्योती उंदिरवाडे, राजन बोरकर यांच्यासह इतर पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.