६० लाखांच्या निधीतून होणार या दुर्गम गावात सिमेंट रस्त्याचे बांधकाम

माजी जि.प. अध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन

अहेरी : तालुक्यातील चिंचगुंडी ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट दुर्गम अशा कोत्तुर गावात साठ लाखांच्या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कोत्तुर येथील सुरेश रामगिरी यांच्या घरापासून ते मोंडी गोलेंटी यांच्या घरापर्यंत कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरते. या प्रभागातील नागरिकांनी सिमेंट रस्ता बांधकाम करून देण्याची मागणी केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेता माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सदर मागणी केली. अखेर ती मागणी मंजूर झाली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम पूर्ण केले जाणार आहे. अंदाजपत्रकानुसार तब्बल 60 लाख रुपयांच्या निधीतून हे काम पूर्ण केले जाणार आहे.

भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते सदर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रभागातील नागरिकांची मोठी अडचण आता दूर होणार असल्याने त्यांनी ताईंचे आभार मानले. या भूमिपूजन सोहळ्याला सरपंच कमला बापू आत्राम, राष्ट्रवादीचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, मखमुर शेख, रामू कस्तुरवार, बिच्चू मंचालावार, बापू गानालावार, शंकर बाकोलू, रामन्ना कस्तुरवार, तिरुपती पालेवार, राजू आत्राम, राजाराम कुमरे, राकेश गानलावार, विनोद देवरवार, गागुबाई कंपेलवार, हरीश येमुलवार आदी गावकरी उपस्थित होते.