अहेरी : अहेरी तालुक्यातील मेडपल्ली ग्रामपंचायतने कोरोनाकाळात केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही गावातील अंगणवाडी मदतनिसांना दिलेला नाही. यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे स्पष्ट निर्देश असताना भत्ता देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्यामुळे या ताईंनी अखेर माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांना हा भत्ता मिळवून देण्यासाठी आर्जव करत निवेदन दिले.
सदर निवेदनानुसार, कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे. मात्र मेडपल्ली ग्रामपंचायतच्या सरपंच व सचिवांनी फक्त आशाताईंनाच प्रत्येकी १५०० रुपये अदा केले. अंगणवाडी ताईंनी अर्ज देऊनही त्यांना याचा लाभ दिला नाही, अशी व्यथा त्यांनी अजय कंकडालवार यांच्याकडे व्यक्त केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके, अजय नैताम, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, पं.स.च्या माजी सभापती सुरेखा आलम, मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, ग्रामसभा अध्यक्ष वासुदेव सिडाम, ग्रामपंचायत सदस्य निरंजना वेलादी, अंगणवाडी सेविका मेडपल्ली सुमन पोदडी, अमुबाई आत्राम, लालसू पलो, दीपक गावडे, विनोद गावडे, मधुकर पोदाडी, सुधाकर पोदाडी, गंगाराम गावडे, भारत आत्राम, निकील वेलादी, कोकशाह सिडाम, सदुनाथ आत्राम, सुरज आत्राम, करण गावडे, सुनील गावडे, विजय वेलदी, सुधाकर सिडाम, साईनाथ तलांडे, निलेश वेलादी, विनोद रामटेके, रवी भोयर, नरेश गर्गम, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.