गडचिरोली : मानवसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हटले जाते. याच भावनेतून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी पुढाकार घेत कुनघाडा येथील पुंडलिक भांडेकर यांच्या दिव्यांग मुलाच्या उपचारासाठी पुढाकार घेऊन त्यांना आर्थिक मदत केली.
भांडेकर यांचा मुलगा लहानपणापासून दिव्यांग असल्याने त्याच्यावर उपचारासाठी पुंडलिक भांडेकर यांनी खूप प्रयत्न केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढील उपचारास मर्यादा आल्या. त्यांची आर्थिक अडचण समजल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी 5 जून रोजी भांडेकर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या अपंग मुलाच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली. पुढेसुद्धा मदत करू असा दिलासा त्यांनी दिला. ही मदत आपल्यासाठी बहुमोलाची असल्याचे भांडेकर म्हणाले.
यापूर्वी सुद्धा खुणे यांनी अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील किडनीग्रस्त युवतीला मदत केली होती. ती युवती आज किडनीच्या आजारातून बरी झाली आहे. अशा अनेक लोकांना मानवीय दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कुनघाडा येथील या भेटीप्रसंगी राहुल झोडे, राकेश डोंगरवार, संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास, महिला आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष पायल कापसे व कृष्णा वाघाडे उपस्थित होते.