गडचिरोली ः पावसाळ्याच्या दिवसात दक्षिण गडचिरोली भागातील तालुक्यांमध्ये (अहेरी विधानसभा क्षेत्र) मोठी पूरपरिस्थिती निर्माण होते. नागरिक अडकून पडतात. घरांमध्ये पाणी शिरते. मात्र अशा अडीअडचणीच्या कठीण काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, घाबरू नका, आम्हाला संपर्क करा, आम्ही मदतीसाठी धावून येऊ, अशी भूमिका घेत माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर सुरू आहे. धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे थोडा पाऊस आला तरी पूर येतो. त्यातच सततच्या पावसामुळे घरांची पडझड होते. अशा स्थिती निवाऱ्याची सोय नसेल, घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याची नासाडी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंची गरज असेल, किंवा अन्य कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास खालील व्यक्तींशी संपर्क करावा असे आवाहन अजय कंकडालवार यांनी केले आहे.
अहेरी जनसंपर्क कार्यालय – अजय कंकडालवार (9689712001, 9421353603), गडचिरोली तालुका- शिवराम पुलूरी (9421555114), मिथुन देवगडे (9146562655), अहेरी तालुका – भास्कर तलांडे (9834485850), अजय नैताम (7972952138), भामरागड तालुका – विष्णू मडावी (9405207887), लक्ष्मीकांत बोगामी (9420215913), सिरोंचा तालुका – रवी सल्लाम (9421989254), किरण वेमुला (9359702571), एटापल्ली तालुका – नंदू मट्टामी (9404838007), प्रज्वल नागुलवार (9405522012), मुलचेरा तालुका – कालिदास कुसनाके (9309542661), रवी झाडे (8275872025)