पोलिस भरतीला येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था

आ.डॉ.देवराव होळी यांचा पुढाकार

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर १९ जूनपासून सुरू झालेल्या पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्यांसाठी जिल्हाभरातून येणाऱ्या उमेदवारांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यासाठी यावेळी आ.डॅा.देवराव होळी यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्रपूर मार्गावरील पटेल मंगल कार्यालयात २० जूनपासून ही व्यवस्था सुरू करण्यात आली असून गरजू उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.होळी यांनी केले आहे.

पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्यांसाठी येणाऱ्या उमेदवारांनी कपडे, अंथरूण-पांघरूण, आपला टॅावेल, ब्रश, साबन आदी दैनंदिन उपयोगी साहित्य सोबत आणावे. चाचणीच्या प्रवेशपत्राची झेरॅाक्स तसेच आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्राची झेरॅाक्स ठेवावी. येण्यापूर्वी आमदार जनसंपर्क कार्यालयातील सहकारी सुरज मस्के (9022163191) किंवा भाजपा शहर उपाध्यक्ष राजू शेरकी (9579474414), किंवा भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष हर्षल गेडाम (8668403959) किंवा तुषार सातपुते (9423841481) यांच्याशी संपर्क करून कधी येणार याबद्दल नोंदणी करावी, असे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालयाने केले आहे.