अहेरी : नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत सुधारणार होईल, असा विश्वास कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
9 जुलै रोजी अहेरी मुख्यालयातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, मुख्याधिकारी एन.सी. दाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, जेष्ठ नागरिक यशवंत दोतूलवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन अहेरी येथे पोहोचल्यानंतर दोन दिवस अहेरी येथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.