खासदार डॉ.किरसान यांनी दाखवली वडसा-चांदाफोर्ट रेल्वेला हिरवी झेंडी

नागभीडपर्यंत रेल्वेतून केला प्रवास

गडचिरोली : कोरोना महामारीत बंद करण्यात आलेली चांदाफोर्ट-वडसा-गोंदिया ही पॅसेंजर रेल्वेगाडी रविवारी पुन्हा सुरू करण्यात आली. वडसा रेल्वे स्थानकावर सकाळी 7.15 वाजता खासदार डॉ.एन.डी.किरसान यांनी वडसा – चांदाफोर्ट रेल्वेला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी खा.किरसान यांच्यासह आ.कृष्णा गजबे यांनी स्टेशन मास्टर, चालक दलाचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ.किरसान यांनी त्याच रेल्वेने वडसा ते नागभीड असा प्रवास करून ट्रेनमधील नागरिकांशी चर्चा केली.

अनेक दिवसांपासून ही रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी होती. अखेर ही गाडी सुरू झाल्यामुळे व्यापारनगरी देसाईगंजसह जिल्हाभरातील प्रवाशांना नागरिकांची सोय झाली आहे.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी पं.स. सभापती परसराम टिकले, काँग्रेस नेते रामदास मसराम, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, उपायुक्त माधुरी मडावी, काँग्रेसच्या किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, श्याम उईके, कोंढाळाच्या सरपंच अपर्णा राऊत, भाजपचे तालुका महामंत्री योगेश नागतोडे, वसंतराव दोनाडकर, मनोज ढोरे, जावेद शेख, विजय सुपारे, भास्कर डांगे, श्याम धाईत, अविनाश गेडाम, आरपीएफचे जयसिंग, लोको पायलट आर.के.गुप्ता, असिस्टंट लोको पायलट रजत खडेंनाथ, गार्ड वेंकटराव यांच्यासह काँग्रेस-भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.