गोंदिया : आदिवासीबहुल भागाच्या विकासासाठी असलेल्या योजनेअंतर्गत खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने सालेकसा तालुक्यात निंबा, बाकलसरा, जांभळी या रस्त्यांच्या एक कोटी २० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. खा.नेते यांच्या हस्ते कुदळ मारून या कामांना सुरूवात करण्यात आली.
यावेळी उपकार्यकारी अभियंता महाजन, शाखा अभियंता मानकर, शाखा अभियंता कश्यप, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री आदित्य शर्मा, दलित आघाडीचे जिल्हा महामंत्री राजेंद्र बडोले, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
रेल्वेच्या अंडरपास पुलासाठी निवेदन
जिल्हा परिषदेच्या विकास निधीअंतर्गत सालेकसा तालुक्यातील २४ लाख रुपयांच्या धानोली-बाम्हणी रस्त्याचे भूमिपूजन खासदार नेते यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या सालेकसा या अविकसित तालुक्यातील या भागात अनेक दिवसांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली होती. खराब रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिक व विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत होती. आता ती अडचण नवीन वर्षाच्या मुहूर्तावर दूर होण्यास सुरूवात झाली. यावेळी रेल्वेच्या अंडरपास पुलासाठी धानोली, बाम्हणी व परिसरातील अनेक गावकऱ्यांनी खा.नेते यांना निवेदन दिले. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
यावेळी भाजपचे सालेकसा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य गुमानसिंग उपराडे, आमगांव तालुकाध्यक्ष राजू पटले, माजी पं.स. सदस्य अर्चना मडावी, तालुका प्रभारी परसराम फुंडे, उपविभागीय अभियंता रवींद्र दमाये, शाखा अभियंता अमित परबत, तालुका उपाध्यक्ष विकी भाटिया, युवा नेते यशवंत मानकर, तालुका महामंत्री मनोज बोपचे, तालुका महामंत्री रामदास हतीमारे, कृ.उ.बा.स. संचालक हुकुम बोहरे, पोलिस पाटील शिला रहिले, माजी सरपंच रतन टेंभरे, माजी सरपंच भरत पटले, माजी सरपंच धनराज थेर, उपसरपंच उषा राऊत, कृष्णाकुमार कुरंजीकर, बलदेव चौधरी, विजय जैतकार, तसेच कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.