अहेरी : तालुक्यातील रेपनपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथील दौऱ्यात माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तेथील कलावंत व भजनी मंडळींना भजनाच्या साहित्यासाठी आर्थिक मदत दिली.
कंकडलावार यांनी नागरिकांशी नाल्या, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व गावांतील विविध विषयांवार चर्चा केली. या चर्चेदरम्यान छल्लेवाडा येथील वृध्द कलावंत व भजन मंडळींना भजनाकरीता साहित्य घेण्यास मदतीची गरज असल्याचे लक्षात येताच अजय कंकडलावार यांनी क्षणाचाही विलंब न करता साहित्य घेण्यास आर्थिक मदत केली. त्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, सरपंच लक्ष्मी मडावी, सरपंच श्रीनिवास पेंदाम, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक, ग्रामपंचायत सदस्य पुजा देवगडे, मपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे, लाब देवगडे, रामचंद्र रामटेके, तेजराज दुर्ग, सू कांबळे, विलास बोरकर, लक्ष्मण रत्नम, मोंडी कोटरंगे, राकेश सडमेक, प्रमोद गोडशेलवार यांच्यासह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.