अहेरी : तालुक्यातील महागाव बुज या ग्रामपंचायतमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी व्यवस्थापनासह पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलची मागणी गावकऱ्यांनी केली होती. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कामे मंजूर करत लाखो रुपयांच्या कामांचे भूमिपूजन अम्ब्रिशराव यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद अंतर्गत २०२२-२३ मधील भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत नाली बांधकाम आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना सन २०२२-२३ अंतर्गत बोअरवेलचे बांधकाम आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यामुळे गावातील सांडपाणी व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासोबत पाण्याचीही समस्या दूर होणार आहे.
यावेळी महागाव बुज येथील सरपंच पुष्पा मडावी, उपसरपंच संजय अलोने, ग्रामपंचायत सदस्य लालू वेलादी, सदस्य दीपाली कांबळे, तसेच महादेव वेलादी, सुरेश वेलादी, बाळू अलोने , सचिन करमे, मोनेष पाटील, धम्मदीप झाडे, आकाश वेलादी, राजेश मिसलवार, रविंद्र मुंजमकार, श्रीकांत चालूरकर, एकलू वेलादी, निखिल कोरेत, प्रकाश वेलादी, हनुमंतू चेन्नरवार, महेश गोंगले, राकेश गोंगले, अजय पानेम, शंकर दहागावकर, अशोक टेकूल, तिरूपती मेरगूवार, माधव झाडे, बुदेश्वर झाडे, श्रीनिवास अलोने, शंकर मुंजमकार, विजू अलोने, कैलास अलोने, मनिष दहागावकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.