गडचिरोली : तालुक्यातील अमिर्झा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांअभावी ढासळली. त्यामुळे रूग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे अशी तक्रार घेऊन सदर उपकेंद्रातील रिक्त पदे तातडीने भरून सेवा सुरळीत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. याप्रसंगी कात्रटवार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत ढासळलेल्या आरोग्य सेवेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. (सविस्तर बातमी खाली वाचा)
यावेळी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, अमिर्झा आरोग्य उपकेंद्रात स्थायी दोन आरोग्यसेविका, आरोग्य सेवक व अन्य पदे रिक्त आहेत. आरोग्य उपकेंद्रांतर्गत अमिर्झा, भिकारमौशी आणि मौशीचक गावे समाविष्ठ आहेत. येथील आरोग्य सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. परिणामी रूग्णांना भर उन्हाळ्यात गडचिरोली येथे धाव घेऊन उपचार घ्यावे लागले. यात रूग्णांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. शारीरिक त्रासाचासुध्दा सामना करावा लागत आहे.
धुंडेशिवनी येथे कार्यरत कंत्राटी आरोग्यसेविकेची अमिर्झा येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. पण सेवा बजावताना संबंधित आरोग्य सेविकेची दमछाक होत आहे. त्यामुळे अमिर्झा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी आणि गोरगरीब रूणांना आरोग्य सेवेचा लाभ द्यावा, अन्यथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी आरोग्य विभागाला दिला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॅा.अमित साळवे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेऊन निवेदन वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी यादव लोहंबरे, संजय बोबाटे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, तेजस धंदरे, रंजीत वलादे, सचिन मडावी, मधुकर बावणे, सुरज वलादे, संदीप नरुले, मनोहर निलेकार, विशाल गुरनुले, जितेंद्र निकोडे, राजेंद्र मेश्राम, गणेश ठाकरे, अमोल चौधरी, शुभम चंद्रगिरे, आरीफ ढवळे, साहिल कारेते, रमेश आवारी, फाल्गुन समर्थ, अमर सोरते, समिर राऊत, अक्षय समर्थ, शुभम अंबादे, चुडाराम राऊत, दीपक राऊत, अजित आजबले, त्रिशुल ठाकरे, वेदांत कस्तुरे, सुरज वाघाडे, रमेश आवारी, तुमदेव आवारी, सुनिल कोसमशिले, तुषार म्हशाखेत्री, विलास ढोलणे, स्वप्निल मांडोलकर, राहुल सावरकर, विनोद पातळ, पुरुषोत्तम डोईजड, प्रणय सोरते, राजू भैसारे, पंकज राऊत, तुषार ठाकरे, साहिल निकुरे, आशिष मुरतेली, समिर पिंपळे, साहिल बारापात्रे, प्रभाकर मेश्राम, आर्यन बांबोळे, प्रणय बोरकर, लोकेश ठाकरे, संकेत बोरकर, सचिन मंगर, साहिल बांबोळे, हिमांशु चौधरी, सुमित डोंगरे, अनिकेत मेश्राम, प्रफुल बांबोळे, कुणाल म्हस्के, अजिंक्य नगराळे, रवि आवारी, तुषार म्हशाखेत्री, रोहित कुसनाके, शुभम पदा, मोहित कोसरे, नवीन आवारी आदि शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.