चामोर्शीत व्यापाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा, समस्या व शासनाच्या धोरणांवर चर्चा

माजी खा.नेते यांची प्रमुख उपस्थिती

चामोर्शी : चामोर्शी राईल मिल आणि धान्य व्यापारी असोसिएशनच्या वतीने येथील शारदा सेलिब्रेशन हॉलमध्ये व्यापाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा घेण्यात आला. भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात व्यापाऱ्यांच्या समस्यांवर तसेच शासनाच्या ध्येयधोरणांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या मेळाव्याला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सारडा यांच्यासह भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार आणि धान्य व्यापारी चंद्रकांत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, कामगार आघाडीचे प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, धान्य व्यापारी दिलीप सारडा, नंदू काबरा, प्रवासी कार्यकर्ता विनिता कुलस्ते, कृ.उ.बा.स.चे संचालक दिलीप भुरले, जेष्ठ नेते नामदेवराव सोनटक्के, धान्य व्यापारी प्रकाश निकुरे, संजय बारापात्रे, कान्होजी लोहंबरे तसेच मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी झाले होते.

मा.खा.अशोक नेते यांनी व्यापार्‍यांच्या समस्या, व्यापार धोरणे आणि शासनाच्या नवीन नियमांविषयी सखोल चर्चा केली. व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याकरिता महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. व्यापार व व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.मिलिंद नरोटे यांना समर्थन देऊन निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांसह इतर व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या आणि भविष्यकालीन व्यापार धोरणांवर संवाद साधला. प्रास्ताविक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सारडा यांनी तर संचालन दिलीप सारडा यांनी केले.

अतिसंवेदनशिल गावांत पोहोचले भाजपचे पदाधिकारी

भाजपचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या निवडणूक प्रचारासाठी गडचिरोली विधानसभेचे सहसंयोजक तथा रेगडी- हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख प्रणय खुणे, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हा संयोजक रमेश अधिकारी यांनी अतिसंवेदनशील गावं असेल्या ढेकणी पुसेर, मूतनूर येथे बुथ प्रमुख व गावातील प्रमुख व्यक्तींची सदिच्छा भेट घेतली. या बैठकींमध्ये कार्यकर्ते, युवक वर्ग व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.