व्यंकटरावपेठा येथे अजय कंकडालवार यांनी स्वखर्चातून उभारले माता मंदिर

गावकऱ्यांच्या साक्षीने उत्साहात लोकार्पण

अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथे जि.प.चे माजी अध्यक्ष, अहेरी बाजार समितीचे माजी सभापती तथा आविसंचे नेते अजय कंकडालवार यांनी स्वखर्चातून उभारलेल्या माता मंदिराचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले. कंकडालवार परिवाराच्या हस्ते पुजा करून हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी अजय कंकडालवार यांनी गावातील वार्ड क्रमांक 3 मधील मुख्य चौकात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्यांबाबत चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान गावात माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गातील समाज बांधवांना कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी अडचण जात होती. कोणत्याही वैयक्तिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमाआधी, तसेच सण-उत्सवात आधी माता मंदिरात जाऊन पूजा अर्चना करूनच कार्यक्रम घेण्याची परंपरा आहे. पण मंदिर नसल्यामुळे शासकीय खर्चातून एक मंदिर बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. परंतू शासकीय योजनेतून मंदिर बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नसला तरीही, मी स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले होते.

आता हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आई मंदा रामय्याजी कंकडालवार, अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सोनाली अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत अजय कंकडालवार यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चना करून मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी गावातील कोणत्याही समस्या असो, मला सांगा, त्या समस्यांचे निराकरण करू अशी ग्वाही नागरिकांना दिली.

यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, इंदारामच्या सरपंच वर्षा पेंदाम, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, व्यंकटरावपेठाचे सरपंच दिलीप मडावी, माजी उपसरपंच गुलाबराव सोयाम, विद्यमान ग्रा.पं.सदस्य मीना गर्गम, मनिषा सडमेक, राजू दुर्गे, माजी उपसरपंच शामराव राऊत, माजी सदस्य अनिता येरमे, माजी सरपंच अशोक येलमुले, सदस्य महेश लेकुरे, माधव राऊत, नरेंद्र गर्गम, हरीबाबा राऊत, रवी कुळमेथे, कुणाल आलाम, नारायण राऊत, महेश दहागावकर, रवी सडमेक, रेखा सडमेक, निरंजना वेलादी, जनाबाई गेडाम, सुशीला काटेल, प्रकाश दुर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते, गावातील नागरिक उपस्थित होते.