गडचिरोलीतील शिवनगरवासियांना टँकरने पाणीपुरवठा

उद्धव ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार आले धावून

गडचिरोली : पाणी हे जीवन आहे. एकवेळ अन्न मिळाले नाही तरी चालते, पण पाण्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची काय महत्व असते हे टंचाईग्रस्त भागातील लोकांशिवाय कोणालाही कळू शकत नाही. गडचिरोली शहरातील शिवनगर या झोपडपट्टीबहुल भागात नगर परिषदेकडून पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत असल्याचे पाहून तत्कालीन शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी स्वखर्चातून टँकरने पाणी पुरवठा करून शिवनगरवासियांची गरज भागवली.

जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडून सोयीसुविधांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. पण वाढत्या शहरीकरणामुळे काही वार्डात आणि नवीन वस्तीत अद्यापही पाण्याची समस्या कायम आहे. शिवनगरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाल्याची माहिती मिळताच अरविंद कात्रटवार हे शिवनगरवासीयांच्या हाकेला धावून गेले. त्यांनी स्वत:च्या खर्चातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे वॅार्डातील महिला, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून भर उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणारी धावाधाव थांबली आहे. कात्रटवार यांच्या या सेवाभावाबद्दल शिवनगरातील महिला व नागरिकांमध्ये कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे.

टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या शुभारंभप्रसंगी पक्षाचे उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ उके, विभाग प्रमुख अमित बानबले, प्रशांत ठाकूर, उपविभाग प्रमुख संदीप आलबनकर, संदीप भुरसे, निकेश मडावी, जगन चापडे, सुरज ऊईके, अंबादास मुनघाटे, कैलास फुलझेले, दिलीप वालदे, अनिल कोसमशिले, भैय्याजी फुलझेले, दिलीप चनेकार, रामभाऊ बाबनवाडे, प्रविण हर्षे, विकास उंदिरवाडे, जयकुमार खेडेकार, अमर निंबोड, विलास सेलोटे, अमित हुलके, सविता सयाम, दुशिला सोनटक्के, राधिका चुनारकर, सविता कोतकोंडावार, प्रिती रामटेके, कुंदा जेंगठे, मंगला बोरकर, रिना मेश्राम, मंगला मेश्राम, सविता मदनकर, सपना खोब्रागडे, सविता कारेते, जास्वंदा गेडाम, आकांक्षा बावणे, संगिता भोयर, कल्पना गटमळे, दुर्गा कांबळे, पपिता बावनकर, दिक्षा पोहणकर, सरिता बावणे, मिनाक्षी मेश्राम, सविता मेश्राम तसेच शिवनगरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिनगरवासियांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावर असलेल्या शिवनगर झोपडपट्टी परिसरात नळ पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनाच्या वतीने केलेली नाही. या ठिकाणी पाचशेपेक्षा अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. शिवनगरात अद्यापही रस्ते, वीज, पाणी आदी सुविधा नाहीत. भर उन्हाळ्यात पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता प्रशासनाकडून या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. परंतू नगर पालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते.