गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात मंगळवारी झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह एकूण १० नक्षलवादी ठार झाले. त्यांची ओळख पटली असून त्यात छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातील कारवायांमध्ये सक्रिय असलेला नक्षल नेता जोगन्ना उर्फ चिमाला नरसैय्या, तसेच पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेले पण सध्या छत्तीसगडमध्ये स्थिरावलेले कंपनी कमांडर मल्लेश आणि असिस्टंट कंपनी कमांडर विनय हेसुद्धा ठार झाले असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली.
विभागीय कमिटीचा सदस्य जोगन्ना हा मुळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी असला तरी त्याने गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडमध्ये अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यानंतर त्याने आपले बस्तान छत्तीसगडमध्ये हलविले होते. पाच वर्षांपूर्वी त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने 20 लाखांचे बक्षीस ठेवले होते. मल्लेश आणि विनय हेसुद्धा गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होते. पण पोलिसांचा दिवसेंदिवस वाढलेला दबाव पाहून त्यांनीही गडचिरोली जिल्ह्यातून काढता पाय घेत छत्तीसगडमध्ये आश्रय घेतला होता.
दरम्यान या चकमकीमुळे गडचिरोली जिल्ह्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे.
(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा पहा खाली)