गडचिरोली : सुदृढ शरीरयष्टी आणि निरोगी आयुष्याकरिता रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीद्वारा ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग व ट्रिटमेंट संस्थान जोधपूर (राजस्थान) यांच्या सहकार्याने गडचिरोलीत ॲक्युप्रेशर व फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून साई मंदिर, डॅा.कुंभारे हॅास्पिटलच्या मागे हे शिबिर सुरू असून त्याचा समारोप आज (दि.24) होणार आहे.
नॅचरोपॅथी रिसर्च ट्रीटमेंट जोधपूरचे थेरपिस्ट राजेंद्र सारण आणि त्यांच्या चमुची सेवा नाममात्र दरात गडचिरोलीकरांना उपलब्ध करण्यासाठी हे शिबिर घेतले जात आहे. या पाच दिवसीय शिबिराचे उद्घाटन डॉ.सोनल चेतन कोवे यांच्या हस्ते आणि डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.चेतन मारोती कोवे, तसेच रोटरीयन चार्टर्ड अध्यक्ष दिवाकर बारसागडे, माजी अध्यक्ष नंदकिशोर काबरा, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील बट्टूवार, सचिव विश्राम होकम, कोषाध्यक्ष नीरज जैन, रोटरियन राजू ईटनकर, केतन कलारिया, अमित सुचक, हेमंत राठी, गोविंद सारडा, सचिन तंगडपल्लीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.