गडचिरोली : विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने प्रलंबित मागण्यांसाठी 26 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह गडचिरोली येथेही या आंदोलनात भूमि अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)
भूमि अभिलेखच्या सर्व कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, परिरक्षण भूमापक यांची रिक्त पदे भरावीत, वर्ग 2 व वर्ग 3 च्या रखडलेल्या पदोन्नत्या देण्यात याव्या, सर्व सर्वेअर यांना लॅपटॉप व रोव्हर पुरविण्यात यावे, नवीन नगर भूमापन कार्यालयांची स्थापना करावी, शासन निर्णयाप्रमाणे भूमि अभिलेख विभागातील पदनामांमध्ये बदल करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. या मागण्यांकरिता भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेने अनेकवेळा पाठपुरावा केला, मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता टोकाची भूमिका घेऊन काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.