गडचिरोली : अहिल्याबाईंचे जीवन हे भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक आहे. समाजसुधारणेच्या कार्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचा आदर्श महिलांनी घ्यावा व समाजात सुरू असलेल्या वाईट चालीरिती बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांचे विचार व कार्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले. सेमाना देवस्थान येथे आयोजीत कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करीत होत्या. (सविस्तर बातमी खाली वाचा)

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गडचिरोली शहरात विविध प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चाच्या वतीने आराध्यदैवत श्री क्षेत्र सेमाना देवस्थान परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता अभियान, जलाभिषेक कार्यक्रम, महाप्रसाद तसेच मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या कार्यक्रमास प्रामुख्याने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, डॉ.चंदा कोडवते, प्रतिभा चौधरी, मुक्तेश्वर काटवे, कविता उरकुडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सेमाना मंदिराच्या परिसरात मान्यवरांनी हातात झाडू घेऊन केरकचरा स्वच्छ केला. तसेच मंदिरात जलाभिषेक व महापुजा सुद्धा केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिल्पकार शिल्पा भोयर यांनी अहिल्याबाईंची प्रतिमा साकारली त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नेत्या प्रतीभा चौधरी यांना ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.