अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील घोडराजमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने झाला कृषी मेळावा

एक हजारावर महिला-पुरूषांची उपस्थिती

गडचिरोली : पोलिस दलाच्या वतीने “प्रोजेक्ट कृषी समृध्दी योजने”अंतर्गत भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस स्टेशनच्या आवारात केले होते. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी शरद काकळीज, तर प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफचे असिस्टंट कमांडट डोंगरे. पोलिस निरीक्षक पॉल, तालुका कृषी अधिकारी भावे, पोउपनि मुंढे, पोउपनि नानोटी, पोउपनि लुबाड, तसेच पोस्टे हद्दीतील गाव पाटील तथा 1000 ते 1100 महिला व पुरुष उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिष देशमुख , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कृषी मेळावा झाला.

मेळाव्यातून साधले हे उद्दिष्ट

यावेळी प्रभारी अधिकारी शरद काकळीज उपस्थित नागरीकांना म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याकरीता शासनाचे लोक आपल्या दारी येतात, त्याचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी भावे यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्याकरीता लागणारी कागदपत्रे याबाबत माहिती दिली. कृषी सहायक आत्राम यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन शेतीविषयक माहिती व सेंद्रीय खताचा वापर करण्याबाबत स्थानिक गोंडी भाषेत मार्गदशन केले.

सदर मेळाव्यादरम्यान धोडराज पो.स्टे.हद्यीतील 47 नागरीकांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले. 48 नागरीकांचे धान बियाणे मिळण्याकरीता परमिट तयार करण्यात आले. 24 नागरीकांना ज्वारी बीज, 30 टिकास, 55 लोखंडी घमेले, 50 सब्बल, 10 स्प्रेपंप वाटप करण्यात आले. तसेच उत्कर्ष बचत गट हिंदेवाडा यांना बॅन्ड साहित्याचे वाटप करण्यात आले. गोंगवाडा येथील अपंग व्यक्ती दौलत कोपा मोडयामी यांना तीनचाकी सायकलचे देण्यात आली. मेळाव्याला उपस्थित सर्व नागरीकांची जेवनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. हा मेळावा यशस्वी करण्याकरीता घोडराज पो.स्टे.येथील सर्व जिल्हा पोलिस व एसआरपीएफचे अधिकारी तथा अंमलदारांनी परिश्रम घेतले.