बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार

ना.विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार आणि आदिवासी समाजाचे आदरस्थान असलेले माजी राज्यमंत्री दिवंगत बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 16 जूनला अभिवादन कार्यक्रमासह नवनिर्वाचित खासदार डॅा.नामदेव किरसान व श्रीमती सुमित्राताई बाबुरावजी मडावी यांचा, तसेच गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सायंकाळी 5 वाजता सुप्रभात मंगल कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहणार असून अध्यक्षस्थानी माजी खासदार मारोतराव कोवासे राहणार आहेत. कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष घनश्याम मडावी, शिवजाी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री तसेच ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत राहतील.

सकाळी 9 वाजता धानोरा मार्गावरील बाबुरावजी मडावी चौकात प्रतिमेचे पुजन आणि अभिवादन कार्यक्रम, 10 वाजता महिला व बाल रुग्णालयात रक्तदान शिबिर, सायंकाळी 4 वाजता सुप्रभात मंगल कार्यालयापर्यंत रॅली काढली जाणार आहे. विविध क्षेत्रात कार्यरत आदिवासी समाजाच्या संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.