गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, तथा कामगार राज्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळालेले ॲड.आशिष जयस्वाल आज (दि.25) गडचिरोलीत मुक्कामी येणार आहेत. उद्या (दि.26) प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
ना.जयस्वाल दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह आरमोरी येथे पोहोचतील. दुपारी 3 वाजता गडचिरोलीच्या शासकीय विश्रामगृहावर येऊन 3.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीला उपस्थित राहतील. रविवार, 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन व संचलन कार्यक्रमासाठी ते पोलीस कवायत मैदानावर उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता गडचिरोली येथुन नागपूरकडे प्रयाण करतील.
































