देसाईगंज : राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य, निवृत्त न्यायाधिश चंदलाल मेश्राम आणि
उच्च न्यायालयाचे वकिल अॅड.किल्लारीकर यांनी गुरूवारी (दि.२२) वडसा येथे भेट दिली. येथील विश्रामगृहात त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजनांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे , तहसीलदार करिष्मा चौधरी, पोलिस निरीक्षक किरण रासकर, मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके, गटविकास अधिकारी पाटील उपस्थित होते. यावेळी मागासवर्गीयांच्या योजना संबंधित लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि त्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी आयोगाच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यानंतर हे सदस्य चंद्रपूरकडे रवाना झाले.