चामोर्शी : श्रीमद् भागवत सप्ताह व श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानदान यज्ञाचे आयोजन चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथे करण्यात आले आहे. वारकरी संप्रदाय तथा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित या सप्ताहात पं.धनराज महाराज नागापुरे हे प्रवचनकार असून परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.
या भागवतप्रसंगी माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना, “आध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे संस्कार, आचार आणि विचारांची निर्मिती होते. आजच्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. या कार्यक्रमांमुळे समाजात धार्मिक व सामाजिक सुधारणा घडून येतील. त्यामुळे आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करून समाजात सकारात्मक बदल घडवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनीही आपले विचार मांडत आध्यात्मिकतेच्या महत्त्वावर भर दिला.
या कार्यक्रमाला सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, भाजपचे तालुका महामंत्री संजय खेडेकर, पंढरीनाथ चुनारकर, मनोहर पा.देशमुख, रमेश पा.नागपुरे, प्रभाकरराव धोटे, गिरीधर गोहने, प्रभाकर लोडे, लालाजी गोहने यांसह कान्होली परिसरातील असंख्य भक्त उपस्थित होते.