गडचिरोली : येथील इंदिरानगरात मकर संक्रांतीनिमित्त महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महिलांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यातून होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात एकने लढा देण्याकरिता स्वतःची ताकत वाढविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
महिलांनी शासनाच्या मोफत योजनांचा फायदा घ्यावा. त्यात मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना, मोफत राशन, महिलांना बसची अर्धी तिकीट, बेटी बचाव बेटी पढाओ, उज्वला गॅस, मातृत्व वंदन योजना, वयोश्री योजना, धार्मिक स्थळांना भेटी देणे इत्यादी योजनांचा फायदा घ्यावा, तसेच भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियान 2024 अंतर्गत सर्वांनी 8800002024 या नंबरवर मिसकॉल द्या. त्यानंतर आलेल्या एसएमएस मधील लिंकमध्ये तुमची माहिती भरा आणि सदस्य व्हा, असे आवाहन यावेळी योगिता पिपरे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्योती बागडे, स्नेहा येरोजवार, सुवर्णा काचर्लावार, सविता बेदेवार, अरुणा नेवारे, अर्चना महाडोळे, ज्योती राऊत, शशिकला जेंगठे, माहेश्वरी राउत, प्रतिभा यद्नुलवार, प्रतिक्षा गोरडवार, ज्योती व्याहाडकर, करिश्मा बेदेवार, निराशा नैताम, सिंधू सेलोटकर, सचिता बेदेवार, वंदना कागदेलवार, उर्मिला लांजेवार, ललिता चौधरी, वेणू सेदुलवार, सुरेखा बदेलवार, संध्या बदेलवार, कुंदा सिडाम व बहुसंखेने महिला उपस्थित होत्या.