गडचिरोलीत आज रौप्य महोत्सवी कारगील विजय दिवस साजरा होणार

युद्धात सहभागी सैनिकांचा होणार सत्कार

गडचिरोली : कारगिल क्षेत्रातील युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा पराभव केला. या ऐतिहासिक घटनेला आज 26 जुलै रोजी 25 वर्ष पूर्ण होत असल्याने कारगिल विजय दिनाचे आयोजन गडचिरोली येथे होणार आहे. शहरातील चंद्रपूर मार्गावरच्या कारगिल चौकातील स्मारकाजवळ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होणार आहे.

या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी सैनिक, पोलीस विभाग, सीआरपीएफ, एनसीसी, स्काऊट-गाईड पथक हे मानवंदना देतील. याप्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे, अशी विनंती उदय धकाते यांनी केली आहे. यावेळी जिल्ह्यातील माजी सैनिक आणि कारगील युद्धात सहभागी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांमधील देशभक्ती जागृत करणारे स्थळ म्हणून कारगिल चौकातील स्थळाकडे पाहिले जाते. येथे वर्ष 2000 पासून दरवर्षी कारगील युद्धातील वीर शहीद सैनिकांना आदरांजली वाहून विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष कालू गोवर्धन, मार्गदर्शक माजी सैनिक कन्हैयासिंह बैस, सुनील देशमुख, नरेश चन्नावार, मोबीन सय्यद, मोतीराम हजारे, प्रकाश धकाते, डॉ.नरेश बिडकर, नंदू कुमरे, विलास जुवारे आदी सदस्य या कार्यक्रमासाठी मेहनत घेत असतात.

हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निवृत्त कर्नल विक्रम मेहता, निवृत्त सुभेदार ऋषी वंजारी, माजी सैनिक महादेव वासेकर, राजू भांडेकर, माजी सुभेदार नामदेव प्रधान, दिगंबर गेडाम, ईश्वर राऊत, सुचिता धकाते, निलिमा देशमुख, विद्या कुमरे, वनिता धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे आदी प्रयत्न करीत आहेत.