पोटेगाव परिसरातील ग्रामसभा व भीमज्योती संस्थेकडून संविधान दिन साजरा

घोषवाक्यांसह प्रभातफेरी, अनेकांचे मार्गदर्शन

गडचिरोली : पोटेगाव परिसरातील ग्रामसभा व भीमज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोटुल समितीमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मुनेश्वर बोरकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर, रिपाइंचे गोपाल रायपुरे (चंद्रपूर), बामसेफचे सचिव प्रमोद राऊत, सुरेश कन्मनवार होते.

सुरुवातीला पोटेगावमध्ये संविधानावर आधारित घोषवाक्यांसह प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर संविधानाचे वाचन शिवा नरोटे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मुनेश्वर बोरकर म्हणाले, संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय दिला. त्यामुळे सर्व जाती-जमातीचे लोक एकत्र राहात आहोत. बामसेफचे कान्हेकर म्हणाले, या देशात संविधान आहे म्हणून आपण स्वाभिमानाने जगत आहोत. जर संविधान संपले तर बहुजन समाज स्वाभिमानशून्य होईल. गोपाल रायपुरे म्हणाले, आज संविधान धोक्यात आले आहे. प्रस्थापित सरकार संविधान संपविण्याच्या षडयंत्रात आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकविणे आपले काम आहे. प्रमोद राऊत यांनी संविधानातील विविध कलमांचे सविस्तर स्पष्टीकरण करून दाखवले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी पं.स.सदस्य मालता मडावी, कांता हलामी, वामन बांबोळे, मनोहर पोटावी, केशव कडयामी, शिवा गावडे, सविता पोटावी, कालिदास हिचामी, अभिमन्यू सुरपाम, स्वीटी गेडाम, महादेव पदा, लक्ष्मण सोनुले, रामेश्वर सोनुले, सयाजी वाडगुरे, राजू पेरगुरुवार, एकनाथ मडावी, दिवाकर फुलझेले , सिद्धार्थ गोवर्धन, लोमेश खुकडकर, पंकज रामटेके, आदित्य रंगारी, नितीन पदा, अर्चना सुरपाम, संदीप पाटील, विलास गोवर्धन, सीताराम तुलावी, संगीता मुंजमकर, शीला रामटेके यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर मुंजमकार यांनी प्रास्ताविक किशोर मुनरतीवार यांनी तर आभार विजय रामटेके यांनी मानले.