मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्रांचे वाटप

अन्याय, अत्याचाराविरूद्ध आवाज उठविणार

अहेरी : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे नवनियुक्त तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचे उपनिरीक्षक गौतम साळवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरित करण्यात आले. यावेळी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांनी मार्गदर्शन करताना, गोरगरीब जनतेच्या मदतीला जाऊन ज्या काही समस्या असतील त्या तत्परतेने सोडविण्यासाठी कटीबद्द रहावे अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पोलीस उपउपनिरीक्षक साळवे यांनी मानवाधिकार संघटना ही महत्वाची संघटना असून अन्याय-अत्याचार करणाऱ्यांविरोधात नेहमी आवाज उचलून सरकारची व जनतेची मदत करीत असते, अशा शब्दात कौतुक केले.

यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र चिमडालवार, तालुका महिला उपाध्यक्ष इंदिरा दुधे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत जोशी, तालुका उपाध्यक्ष (महिला) मनिषा आलाम, सदस्य सुरेश देवराव अलोने, अजय नानाजी ठाकरे, जिल्हा विधी सल्लागार ज्योती ईश्वर डोके, जिल्हा सल्लागार रिजवान शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी रमा राजेंद्र चिमरालवार, जोत्स्ना शंभरकर, अस्वनी चिमरालवार प्रामुख्याने उपस्थित होते.