मुलचेरा येथे शासकीय आधारभूत मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ

काटा पुजन करून खरेदी केंद्राचे उद्घाटन करताना खासदार अशोक नेते व इतर.

मुलचेरा : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या वतीने मुलचेरा येथे शासकीय आधारभूत किमतीनुसार मका खरेदी केंद्राचा शुभारंभ ३ जून रोजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश दता, जिल्हा सचिव तथा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संजिव सरकार, जिल्हा सचिव बादल शहा, बंगाली आघाडीचे जिल्हा महामंत्री विद्यान वैद्य , तालुका अध्यक्ष अशोक मुजुमदार बुथ प्रमुख रणजीत मंडल, नेपाल सरकार, अशोक कर्मकार, सत्यजित मंडल, परितोष हलदार, मोतीलाल मंडल, मिलन विश्वास, बबलु मुजुमदार, समिप सरकार, गणेश बारई यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

उन्हाळी मका हा शेतकऱ्यांसाठी दुय्यम पीक म्हणून या परिसरात मोठया प्रमाणात घेतल्या जातो. खरेदी केंद्रामुळे याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना होईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.