यावर्षीच्या खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 71, शेतकऱ्यांना दिलासा

पावसाच्या योग्य प्रमाणामुळे पीक उत्तम

गडचिरोली : यावर्षीच्या खरीप पिकांची हंगामी पैसेवारी सर्व तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जाहीर करण्यात आली. सरासरी 0.71 एवढी पैसेवारी आली असून एकाही गावाची पैसेवारी 50 च्या आत नाही. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून खरीप पिकांची गावे 1548 आहेत. एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावांची संख्या 8 आहेत. त्यापैकी खरीप गावांमध्ये पीके नसलेली गावे 52 आहेत. उर्वरित सर्व म्हणजे 1504 गावांची हंगामी पैसेवारी 0.71 असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. पीक हाती येईपर्यंत कोणती नैसर्गिक आपत्ती न आल्यास यावर्षी शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न होऊ शकेल.